वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला
वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला
अकलूज(रमजान मुलाणी) - शुक्रवार दिनांक 28 मे रोजी गावठी दारू च्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस ताफ्यावर वेळापूर येथील विद्युत बोर्डाच्या पाठीमागील पारधी वस्तीच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक.भगवान खारतोडे हे गंभीररीत्या जखमी असून त्यांच्यावर सध्या अकलूज येथे उपचार सुरू आहेत, तसेच चालक कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके व हेडकॉन्स्टेबल दीपक मेहरकर हे जखमी झालेले आहेत.
वेळापूर येथील चालू असलेल्या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी इन्स्पेक्टर भगवान खारतोडे हे प्रयत्नशील असून त्यांनी दोन पोलीस कॉन्स्टेबल व होमगार्ड यांना सोबत घेऊन छापेमारी ला गेले असता हा सगळा प्रकार घडून आला असल्याचे सांगितले जात आहे. अधिक तपास सुरू आहे .
.
Comments
Post a Comment