कुरुंदवाड नगरपालिका प्रशासनाचे नागरिकांना आवाहन.
कुरुंदवाड नगरपालिका प्रशासनाचे नागरिकांना आवाहन.
कुरुंदवाड -
कुरुंदवाड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शहरातील काही व्यापारी 11 वा नंतर ही दुकाने सुरू ठेवत आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असून जे नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत त्यांची अँटीजन चाचणी करून त्यांच्यावर पाचशे रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येथील पालिका सभागृहात मुख्याधिकारी जाधव,पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकी जे व्यापारी अत्यावश्यक सेवा वगळून 11वा. दुकाने चालू ठेवतील त्यांच्यावर थेट कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे ठरले तर शहरात संचारबंदीचे उल्लंघन करून मास्क न वापरता विनाकारण फिरणारे नागरिक व दुचाकीस्वार यांची अँटीजन चाचणी करून त्यांच्यावर 500 रुपयेेे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
शहरात गुरुवारी भरणारा बाजार रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेेेरील गावातील भाजीपाला व्यापाऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी शहरात येऊ नये असे अवाहन ही याबैठकीत करण्यात आले.
Comments
Post a Comment