लॉकडाऊनमुळे सोनेवाडी गावात सुकसकाट
कोपरगाव (मधुकर वक्ते) - राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील सर्व लहान मोठे व्यापार किराणा दुकानदार यांनी स्वःय स्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवल्याने गावात सुकसुकाट जाणवत होता . लॉक डाउन शंभर टक्के यशस्वी झाल्याची माहीती सरपंच गंगाराम खोमने,उपसरपंच किशोर जावळे यांनी दिली.
गावाच्या विकासासाठी सोनेवाडी ग्रामपंचायत नेहमी प्रयत्न शिल असते इतर वेळी गावात परिसरातील नागरीकांची नेहमीच वर्दळ असते.परंतु राज्य सरकारने सुरू केलेल्या या लॉकडाऊनमुळे सोनेवाडी नागरिकांसह लहान मोठया व्यापाऱ्यांनी घरातच रहाणे पसंत केल्याने कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होणार असुन कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल अशी आशा सोनेवाडीचे सरपंच गंगाराम खोमने,उपसरपंच किशोर जावळे , यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment