यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मस्थळास भेट आणि अभिवादन

                                       यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मस्थळास भेट आणि अभिवादन



आटपाडी  - 
 भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मस्थळी खानापूर - आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देवून या पवित्र वास्तू आणि चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन केले .
 पलुस तालुक्यातील देवराष्ट्रे या गावी यशवंतराव चव्हाण साहेबांचा त्यांच्या आजोळी जन्म झाला होता . चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूस राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते आनंदराव बापु पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर आटपाडी विधान सभा मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, राष्ट्रवादीच्या सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत, सामाजीक न्याय विभागाचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब लिंगडे , माडगूळे ग्रामपंचायतीचे सदस्य अमोलशेठ विभूते, नितीन लिंगडे, बागायतदार यशवंत खळगे यांनी भेट देवून वास्तू आणि चव्हाण साहेबांच्या पवित्र आत्म्यास अभिवादन केले .

Comments

Popular posts from this blog

वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला

कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच; भिलवडीमध्ये मृत मासे