रांझणीचे सुपुत्र आण्णासाहेब शिंदे यांची सहाय्यक पोलिस पदी पदोन्नती

 


पंढरपूर -
 
 
पंढरपूर तालुक्यातील रांझणी गावचे सुपुत्र आण्णासाहेब शिंदे यांची नुकतीच सहाय्यक पोलिस निरीक्षक(API) पदी नियुक्ती झाली आहे.या अगोदर ते कोल्हापूर येथे पोलिस उपनिरीक्षक पदी कार्यरत होते.तेथील कार्याचा आढावा घेऊन त्यांची गडचिरोली परिक्षेत्रात सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) पदी नियुक्ती झाली आहे. याबद्दल रांझणी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.पोलिस कर्मचारी ते सहाय्यक पोलिस पदापर्यत भरारी घेणारे आण्णासाहेब शिंदे हे एक संयमी पण धडाकेबाज कारवाई करणारे पोलिस अधिकारी सर्वपरिचित आहेत.पोलिस दलात काम करत असताना त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहेयाच कार्याची दखल घेऊन त्यांना पदोन्नती मिळाली आहे.

Attachments area

Comments

Popular posts from this blog

वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला

कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच; भिलवडीमध्ये मृत मासे