वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट शाखेकडून विविध विभागातल्या 300 जणांना अन्नदान व फळवाटप.

 अक्कलकोट -  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट वंचित बहुजन शाखेकडून विविध विभागातल्या कर्मचारी यांना अन्नदान व फळवाटप चा कार्यक्रम घेण्यात आला.*

           अक्कलकोट वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त लॉकडाऊन मध्ये उपास मार होत असलेले गरजू, व तसेच कोरोना विषाणू च्या दुसऱ्या टप्प्याच्या लढाईत आपले परिवार नातेवाईक कुटुंब सोडून जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपले कर्तव्य अतिशय इमानेइतबारे बजावणाऱ्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, तसेच रात्रंदिवस ड्युटी करणारे पोलीस प्रशासन आणि आपल्या जीवाची तमा न बाळगता प्रत्येकाच्या घरी गॅस सिलेंडर घरपोच करणारे कर्मचारी या सर्वांना वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट च्या वतीने अन्नदान व फळे वाटप करण्यात आली 


सुरुवातीला भिक्षुक लोकांचे अत्यंत उपासमार होत असताना त्यांना एक छोटासा हात देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने उत्तर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड साहेब व सामाजिक कार्यकर्ते राम जाधव साहेब यांच्या हस्ते अन्नदान व फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे  ,  शिव बसव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मडी खांबे ,महासचिव नागेश हरवाळकर तालुका सचिव खाजाप्पा हिवाळे शहराध्यक्ष राहुल मोरे तालुका संघटक बबन गायकवाड तालुका उपाध्यक्ष रमजान मुल्ला रूकमाजी मेजर साहेब तालुका संघटक आनंद मोरे शिवाजी चौगुले शहर महासचिव चनुशिंगे शहर उपाध्यक्ष संजीव शिंगे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे तालुकाध्यक्ष रवी पोटे भारत सोनकांबळे दत्ता मडी खांबे सचिन मेजर मडी खांबे प्रकाश उर्फ पिके की रात युवा नेते प्रकाश शिंदे शहर पदाधिकारी राहुल हरवाळकर विनायक हरवाळकर प्रसिद्धीप्रमुख जय नडगम युवक पदाधिकारी गंगाराम गायकवाड यास अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
   
        अक्कलकोट  तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी चपळगाव शाखेकडून तालुका महासचिव नितीनशिवशरण व तालुका प्रसिद्धी प्रमुख संदीप गजधाने यांच्या नेतृत्वाखाली ् प्राथमिक आरोग्य केंद्र चप्‍पळगाव येथे अभिजीत पाटील यांच्या हस्ते फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी चप्‍पळगाव तील वंचित चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला

कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच; भिलवडीमध्ये मृत मासे