6000 रुपयाची लाच घेताना तलाठी ताब्यात ; सांगली लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सांगली :- 
कवठे महांकाळ तालुक्यातील तिसंगी येथील रामु पांडुरंग कोरे वय ४३ वर्ष यांना ६,०००/ रुपये लाच स्विकारताना  रंगेहात पकडण्यात आले.. सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे आजोबांनी तक्रारदार व त्याची आई यांचे नांवाने केलेल्या बक्षीस पत्राची हक्क अधिकार पत्रकात नोंद धरणे करीता तिसंगी, ता. कवठेमहांकाळ येथिल तलाठी श्री. कदम यांनी तक्रारदार यांचेकडे ९,०००/- रूपयेची लाच मागणी केली असल्याबाबत तक्रारदार यांनी सांगली लाच लुचपत कार्यालयाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तलाठी कोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे चर्चेअंती ६०००/- रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम दि. ११.०५.२०२१ रोजी घेवून येण्यास सांगीतलेचे निष्पन्न झाले.

त्यानंतर दि. ११.०५.२०२१ रोजी तलाठी कार्यालय तिसंगों, ता. कवठेमहांकाळ येथे सापळा लावला असता रामु पांडुरंग कोरे वय ४३ वर्ष तलाठी, तिसंगी, ता. कवठेमहांकाळ, सांगली वर्ग-३ यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून तक्रारदार यांचेकडून ६०००/- रूपये लाच रक्कम स्विकारत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राजेश बनसोडे सो पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, व श्री सुहास नाडगौडा सो अपर पोलीस उप आयुक्त / अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुजय घाटगे सो पोलीस उप अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली श्री. प्रशांत चौगुले पोलीस निरीक्षक श्री गुरुदत्त मोरे, पोलीस निरीक्षक, तसेच पोलीस अंमलदार पोहेकॉ संजय संकपाळ, पो.ना. धनंजय खाडे, प्रितम चौगुले, चालक पोना पवार, सपोफो रविंद्र धुमाळ, पोहेकॉ संजय कलकुटगी, सलीम मकानदार, पोकॉ अविनाश सागर यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला

कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच; भिलवडीमध्ये मृत मासे