नवऱ्याच्या अनैतिक संबंधाला कंटाळून कुची येथील विवाहितेची आत्महत्या
कवठेमहांकाळ -
कवठेमंकाळ तालुक्यातील कुची येथील सौ.माधवी धनाजी जाधव या विवाहितेने नवऱ्याच्या बाहेरील अनैतिक संबंधाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.कुची येथील जाधव वस्ती वरील धनाजी मारूती जाधव यांची पत्नी सौ.माधवी धनाजी जाधव या विवाहीत महिलेने नवऱ्याच्या अनैतिक संबधाला कंठाळून राहत्या घरी पहाटे लोखंडी अंगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेची फिर्याद मयत माधवी यांची आई वैशाली पाटील विसापूर ता.तासगाव यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे. यापुर्वीही चार वेळा नवऱ्याने द्राक्ष बागेसाठी माहेरहून पैसे घेऊन ये . शिवाय बाहेरील शेजारच्या मुलीशी धनाजी याचे प्रेम संबंध आहेत त्यामुळे मयत माधवीला सतत त्रास केला जात होता .म्हणून माधवीला चार वेळा जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता असे मयत माधवीच्या आईने आपल्या तक्रारी म्हटले आहे.या पुर्वीही त्याचार छळ व मारहाणीची कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिवाय सांगली महिला कक्षात ही तक्रार केली होती.
Comments
Post a Comment