महानगरपालिका क्षेत्रातील कोरोणा विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नागरिकांकडून नियमांचे सक्तीने पालन करुन घ्यावे.

                   महापौर दिग्विजय प्रदीप सुर्यवंशी यांचे महापालिकेतील बैठकीत सूचना

सांगली :
 महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नागरिकांकडून
नियमांचे सक्तीने पालन करुन घ्यावे असे आवाहन महापौर दिग्विजय प्रदीप सुर्यवंशी यांनी महापालिकेत आयोजित बैठकीत केले.
        महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिवसें दिवस कोरोना विषाणूने बाधीत रुग्णांच्या वाढत्या संख्येस आळा घालण्यासाठी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांचे अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालय येथे बैठक झाली. यावेळी महापौर सूर्यवंशी बोलत होते. या  बैठकीमध्ये बाधीत व्यक्तींच्या संपर्कात असल्यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तीही मोठ्या प्रमाणावर बाधीत होत
असलेचे आढळून येत आहे. त्यामुळे भागातील नेमणेत आलेल्या समन्वयक यांनी बाधीत रुग्णांच्या कुटुंबीयांना विनाकारण घरा बाहेर न पडणे व इतर व्यक्तींना घरात येऊ न देणे बाबतच्या सुचना करणेत याव्यात. पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच त्याचे घर व परिसर तात्काळ निरजंतूकीकरण (औषध फवारणी) करुन घेणेत यावा. बाधीत व्यक्तींच्या घरावर लावण्यात आलेले स्टीकरची पाहणी करणे व स्टीकर न काढणेबाबत समज देणे, समज देऊनही स्टीकर काढलेचे अढल्यास समन्वयक यांनी कायदेशीर कारवाई करणे. रुग्ण पॉझीटीव असलेचे समजले नंतर त्या भागातील मनपाच्या मेडीकल ऑफिसर यांनी रुग्णाच्या
कुटुंबातील इतर सर्व व्यक्तींची आवश्यक सर्व टेस्ट रुग्णाच्या घरी जावून करणे व पुढील कार्यवाही ठेवणे. समन्वयक यांनी त्यांच्या भागातील जनरल पॅक्टीशियन यांना भेट देणे, त्यांचेकडे कायमस्वरुपी येणाऱ्या पेशंटमधील एखादी व्यक्ती बाधीत अढळल्यास समन्वयक यांनी जनरल पॅक्टीशियन यांच्या मार्फत त्या
कुटुंबाला नियमांचे पालन करणेबाबत सूचना व प्रबोधन करणे. ज्या रुग्णांच्या घरी विलगीकरणाची व्यवस्था नाही तसेच सामाईक शौचालय व्यवस्था आहे अशा रुग्णांची भागातील मेडीकल ऑफिसर यांनी रुग्णाची कोव्हीड केअर सेंटर येथे व्यवस्था करावी. जे बाधीत रुग्ण अथवा कुंटुंबीय होम क्वारंटाईनमध्ये आहेत व सूचना देऊनही नियमांचे पालन करित
नाहीत अशा व्यक्तींना सक्तीने भागातील समन्वयक व मेडीकल ऑफिसर यांनी कोव्हीड केअर सेंटर येथे दाखल करावे. खाजगी व मनपा आरोग्य केंद्रावर टेस्ट करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीचे संपुर्ण नाव, पत्ता व एका पेक्षाजास्त संपर्क क्रमांक इत्यादीची सक्तीनी नोंद करावी. या पध्दतीची कार्यवाही करणेबाबत महापौर दिग्विजय प्रदीप सुर्यवशी यांनी महानगरपालिका प्रशासनास सुचना दिल्या.


सदर बैठकीस स्थायी समिती सभापती पांडूरंग कोरे, उपायुक्त सांगली राहुल रोकडे, उपायुक्त मिरज स्मृती पाटील, सहा.आयुक्त पराग कोडगुले, आरोग्याधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ.रविंद्र ताटे, नगरसचिव चंद्रकांत आडके यांचेसह मनपाचे सर्व मेडिकल ऑफिसर, प्रभाग क्र.१ ते २० चे समन्वयक, जनरल प्रेक्टीशन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण कोळी, निमा संघटनेचे अध्यक्ष देवपाल बरगाले व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला

कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच; भिलवडीमध्ये मृत मासे