कोरोनाचा प्रसार आणि फैलाव रोखण्यांसाठी २१ मे पर्यंत कडक लॉकडाऊन
हातकणंगले -
आजूबाजूच्या गावांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे संबंधित गावांनी सोयीनुसार लॉक डाउन केले आहे.परिणामी त्या गर्दीचा भार हातकणंगलेत वाढत असल्याने हातकणंगलेतील कोरोनाचा प्रसार आणि फैलाव रोखण्यांसाठी बुधवार ता.१२ते शुक्रवार तारीख २१ मे पर्यंत कडक लॉक डाऊन करण्याचा निर्णय आज नगरपंचायतीमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यांत आला. दरम्यान राज्य किंवा केंद्र शासनाने याही पुढे लॉक डाऊन जाहिर केले तर त्या निर्णयाशी बांधील रहात२१ तारखेच्या पुढेही लॉक डाऊन नियमित करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून हातकणंगलेतील रूग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे, शिवाय मृत्यूंची संख्याही अधिक आहे. अशातच परिसरांतील आळते, कुभोज, मजले, कोरोची आदी गावांतही रुग्णसंख्या वाढत असल्याने त्या त्या गावांनी लॉक डाऊन चा निर्णय जाहिर केला आहे.
त्यामुळे हातकणंगलेतील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील दिशा ठरवण्यांसाठी आज नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. यावेळी दहा दिवस कडक लॉक डाऊनचा निर्णय घेण्यात आला. या दरम्यांन केवळ वैद्यकीय सुविधा, मेडिकल, डेअरी वृत्तपत्र व लसीकरण ठरलेल्या वेळेत सुरू राहणार असून विना मास्क फिरणाऱ्याना दोनशे रूपये तर विनाकारण फिरणाऱ्यांना पाचशे रूपये दंड ठोठावण्यांत येणार आहे. प्रारंभी मुख्याधिकारी योगेश कदम यांनी स्वागत केले तर आरोग्य सभापती विजय खोत यांनी आभार मानले.बैठकीला उपनगराध्यक्षा प्राजक्ता उपाध्ये, सर्व नगरसेवक, मधुकर परीट, अतुल मंडपे, सुरेश खोत आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment