कोरोना मुळे रोजगार नाही सर्व काही ठप्प , घडशी समाजाला शासनाकडून न्याय मिळावा - अनिल पवार
सातारा - पूर्वीपासून देवस्थानांमध्ये सनई-चौघडा नगारा वाजवणे लग्न समारंभामध्ये सनईवादन बँड बॅन्जो मावळा ग्रुप यासारखी कामे करणे फुलांचे हार बनविणे या व्यवसायावर उदरनिर्वाह करतो घडशी समाज हा पूर्वीपासूनच गरीबीत जीवन जगणारा घडशी समाज हा भूमी हिन आहे त्यामुळे बॅंन्ड बॅंजो हार व्यवसायावरच कसे बसे जिवन जगतो व या व्यवसायावर अवलंबून असतो समाजात दररोज रोजीरोटीचा प्रश्न असल्यामुळे शिक्षणाचे प्रमाण कमी अगदी हाताच्याबोटावर मोजण्याएवढेच लोक सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत गेल्या वर्षी कोरणा मुळे कोणताही व्यवसाय चालला नाही सरकारी कोणतीही मदत घडशी समाजाला मिळाली नाही भुमी नाही शिक्षणा ची ईच्छा असुन घरची परिस्थिती बेताची त्या मुळे शिक्षणाचा अभाव त्यामुळे सरकारी बॅंकेचे लोन व्यवसायाला मिळत नाही मग या स्पर्धेच्या युगात टिकुन राहुन व्यवसाय चालावे या साठी खाजगी कर्ज काढून वरील व्यवसायात गुंतवणूक केली कोरोनामुळे ते कर्ज ही फीटले नाही जवळची जी काही थोडी पुंजी होती तिची मोडतोड करून कसंतरी जिवण जगावं लागलं व्यवसाय ठप्प असलेने मुलांच्या शिक्षणाच्या फी साठी सुद्धा खूपच तारांबळ झाली कसंतरी कुटुंब जगवलं शहरातील समाज बांधवांचे तर खूपच हाल झाले पुढील चांगले दिवस येतील हे आशा घेऊन कसंतरी दिवस ढकलले परंतु याही वर्षी कोरोना ने डोकं वर काढलं आणि समाज पुरता कोलमडून पडला सलग दोन वर्षे कोरोना ने सगळंच ठप्प झालं आहे कसं जगायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे प्रचंड ताण तणाव हाल-अपेष्टा हा समाज भोगत आहे तरी शासनाला विनंती आहे कि समाजाची दखल घेऊन समाजाला काहीतरी मदत शासनाने जाहीर करावी व आता होणर्या ओ बी सी मध्ये जात निहाय जणगनणा मध्ये अाम्हाला योग्य तो न्याय मिळावा व शासन दरबारी आमची नोंद घ्यावी अशी मागणी घडशी समाज संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल शंकर पवार यांनी केली आहे
Comments
Post a Comment