"शामरावनगर परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात" - नगरसेवक अभिजीत भोसले.
सांगली :-
शहरातील शामरावनगरसह परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. दलदल निर्माण होते. या परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नगरसेवक अभिजीत भोसले यांनी केली होती. याची दखल घेत शामरावनगर परिसरात साचणारे पाणी नैसर्गिक उताराने काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
शहरातील शामरावनगर परिसरात पावसाळ्यात प्रचंड दलदल निर्माण होते. पाण्याचा नैसर्गिक निचरा होत नसल्याने दरवर्षी शामरावनगमधील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागतात. रस्ते खराब होतात. नागरिकांना दळणवळण करण्यात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतौ. पाणी साचून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढते. परिणामी साथीचे रोग पसरतात. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. प्रभागातील काँग्रेसचे नगरसेवक अभिजीत भोसले यांनी या परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली होती.
यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. अखेर त्यांच्या पाठपुरवठाला यश आले आहे. पावसाळ्यात शामरावनगरमध्ये साचून राहणारे पूराचे पाणी नैसर्गिक उताराने बाहेर काढणेचे काम सुरू करण्यात आले आहे. शामराव नगर, खिल्लारे मंगल कार्यालय, कालिका मंदीर परिसर, उदय हॉटेल परिसर, श्रीराम कॉलनी, झुलेलाल मंदीर परिसरात असमतल मागामुळे दरवर्षी पावसाचे पाणी वर्षभर साचून रहात होते. या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. या पावसाळा कनत्रालावधीत पावसाळी पाण्याचा शंभर टक्के निचरा होण्यासाठी नैसर्गिक उताराच्या दिशेने पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Comments
Post a Comment