अॅपेक्स कोवीड सेंटर बंद करण्याचे आदेश : आयुक्त नितीन कापडणीस यांचे आदेश
सांगलीः-
सांगली-मिरज रस्त्यालगत असलेले अपेक्स कोव्हिड केअर सेंटर बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दिले आहेत. याबाबतची नोटीस रुग्णालय व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. यामध्ये यापुढे नवीन रुग्णांची भरती करु नये, आहे त्याच रुग्णांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज द्यावा असे आदेशामध्ये म्हंटले आहे. अपेक्सच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात आली.
सांगली-मिरज रस्त्यालगत कोव्हिड केअर सेंटर म्हणून अधिगृहीत केले होते. दरम्यान रुग्णालय सुरु झाल्यापासून तेथील अनागोंदी कारभाराबाबत मनपा आयुक्तांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. रुग्ण, नातेवाईकाशी गैरवर्तन करणे, बिलांसाठी अडवणूक करणे, उर्मट, अ्वाच्च भाषेत बोलणे, अस्वच्छता यासह अन्य तक्रारींचा यामध्ये समावेश होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी आयुक्त कापडणीस यांनी स्वत: या रुग्णालयाला भेट दिली होती. तेथील कारभाराचा पंचनामा केला होता. असलेले अपेक्स रुग्णालय महापालिकेने रुग्णालय व्यवस्थापनाला कारभार सुधारण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली होती. मात्र या काळातही तक्रारी सुरुच होत्या. त्यामुळे अखेर आयुक्तांनी या रुग्णालयाला कोव्हिड केअर सेंटर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये यापुढे नवीन रुग्णांची भरती करु नये, आहे त्याच रुग्णांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज द्यावा असे आदेशामध्ये म्हंटले आहे.
Comments
Post a Comment