घाटमाध्यावरुन "कृष्णा" निवडणुकीसाठी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे तीन अर्ज .
कडेपूर - पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल कडून घाटमाथ्यावरुन मा.आ.पृथ्वीराज देशमुख (बाबा ) व संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.रामचंद्र महाडीक (फौजी), श्री .भारत पाटील (काका) चिंचणी (अं) तर मोहिते वडगावचे श्री. अशोक देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी उमेदवार रामचंद्र महाडीक (फौजी), भारत पाटील (काका),अशोक देशमुख यांच्या बरोबर प्रमोद पाटील,अशोक पाटील, प्रकाश पाटील, संजय देशमुख,अफजल मुजावर,सुधीर मोहिते, सुरेश मोहिते, सूचक कृष्णराव मोहिते, अनुमोदक शिवाआप्पा कार्यकर्ते सु.धो. मोहिते , राजू पाटील, फटेराव मोहिते, सुदाम काळे, शिवा काका मोहिते, किरण पाटील, भास्कर महाडीक,नामदेव महाडीक, जयंत पाटील, सोपानराव जाधव, उदयसिंह पाटील, राजेश महाडीक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment