सांगली जिल्ह्याचे पोलिस उप अधीक्षक अजित टिके व सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगलीवाडी येथील रॉयल कृष्णा बोट क्लबला सदिच्छा भेट
सांगली जिल्ह्याचे पोलिस उप अधीक्षक अजित टिके व सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगलीवाडी येथील रॉयल कृष्णा बोट क्लबला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी क्लब ने महापूर 2019 व कोरोना च्या महामारीमध्ये जे काम केले, त्याचे कौतुक केले. सर्व रेस्क्यू व अत्यावश्यक साहित्याची ची पाहणी केली. आणि येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन बाबत केलेल्या तयारीची पाहणी सुद्धा केली .
महापुरातील नैसर्गिक आपत्तीत केलेल्या कामगिरी बद्दल रॉयल कृष्णा बोट क्लब च्या सर्व स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला. या वेळी बोट क्लब चे अध्यक्ष प्रताप जामदार, सचिव दत्ता पाटील, सहसचिव विनोद नलवडे तसेच रॉयल कृष्णा बोट क्लब चे सर्व पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.
Comments
Post a Comment