शिरोळ गावठाण विस्तार वाढीचा प्रश्न अंतिम टप्प्यात : सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतला आढावा
शिरोळ -
नव्याने नगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या आणि पूर्वी ग्रामपंचायत असलेल्या शिरोळ गावच्या विस्तार वाढीचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात असून लवकरच या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर एक कोटी सात लाख निधी पैकी पहिला हप्ता प्राप्त होत असून गावठाण विस्तार वाढीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली,
शिरोळ नगरपरिषद विस्तारवाढी संदर्भात राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज शिरोळ येथील भूमी अभिलेख कार्यालयात उपस्थित राहून या प्रश्नाचा सविस्तर आढावा घेतला यावेळी शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे- धुमाळ, आणि भूमी अभिलेख अधिकारी श्रीमती मसने प्रमुख उपस्थित होत्या,
सन २००६ साली शिरोळ गावठाण विस्तार वाढीची अधिसूचना प्रसिद्ध झाली होती, त्यावेळी गावठाण विस्तारवाढी मध्ये २५६ गट समाविष्ट होते सदरची विस्तार वाढ ही चार गटांमध्ये विभागली होती ज्यामध्ये औद्योगिक, शेती व इतर असे वर्गीकरण केले होते पण विस्तारवाढीचे हे काम निधीअभावी जवळपास पंधरा वर्षे रखडले होते,
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ नगरपरिषदेच्या व नगराध्यक्षांच्या या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करताना उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार,
मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे या प्रश्नासाठी आग्रह धरून जिल्हा नियोजन समितीमधून विस्तार वाढीच्या या कामासाठी निधीची मागणी केली होती, याचाच भाग म्हणून मार्च 2021 मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून शिरोळ नगरपरिषदेच्या गावठाण विस्तार वाढीसाठी एक कोटी सात लाखाचा निधी मंजूर झाला होता.
सदरचा निधी तीन टप्प्यांमध्ये प्राप्त होणार असून त्याचा पहिला हप्ता लवकरच मिळणार असल्याने शिरोळ नगरपरिषद गावठाण विस्तार वाढीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे, गावठाण विस्तारवाढीचे हे काम वर्षभरात पूर्ण करण्यासाठी भूमी अभिलेख विभाग सज्ज आहे असे यावेळी तालुका भूमि अभिलेख अधिकारी श्रीमती मसने यांनी सांगितले, राज्यमंत्री यड्रावकर यांनी याबाबत सविस्तर माहिती घेत भूमिअभिलेख विभागाकडून आतापर्यंत केलेल्या कामाची प्रशंसा केली,
शिरोळ नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश गावडे, योगेश पुजारी, राजेंद्र माने, शिरोळ चे माजी सरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह माने -देशमुख, अमर शिंदे आणि पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार उपस्थित होते.
Comments
Post a Comment