बिरुबन सुळकी खडी चेथे कृष्णामाईचे आनंदात स्वागत !

 आटपाडी :- 

                टेंभू योजनेचे बंदिस्त पाईपलाईन मधून बिरुबन सुळकी खडी आटपाडी येथे आलेल्या कृष्णामाईच्या पाण्याचे ढोल कैताल आणि घोषणांच्या गजरात पुजन करण्यात आले .
                राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्याचे ज्येष्ट नेते आनंदरावबापु पाटील यांच्या सन्माननीय उपस्थितीत आणि  डिसेबर १९९२ रोजी पाणी लढ्यासाठी क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी डॉ.भारत पाटणकर यांना आटपाडीत सर्वप्रथम आणणारे पाणी लढ्याचे अग्रदुत , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विधीवत पुजन करीत कृष्णाईच्या पाण्याचे स्वागत केले गेले .


क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी , जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील, डॉ .भारत पाटणकर, आनंदरावबापू पाटील , पाणी चळवळ, श्रमिक मुक्ती दल यांच्या विजयाच्या घोषणा देत कृष्णामाईस वंदन करण्यात आले .
                यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, एस.टी.च्या इंटक युनियनचे जिल्ह्याचे नेते विकासराव देशमुख,रामभाऊ दाईंगडे,शिवाजी मेटकरी, बाळकृष्ण खंदारे, सौ . पार्वती खंदारे, चंद्रकांत तळे,बाबुराव मेटकरी,दत्ता मेटकरी,संजय मेटकरी ,हणमंत मेटकरी , शशिकांत मुढे, सतीश मरगळे हे मान्यवर उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला

कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच; भिलवडीमध्ये मृत मासे