तुंग येथील बालिकेच्या खुनाचा उत्कृष्ठ तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी , अमंलदार याचा गौरव
पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम यांचे हस्ते प्रशस्ती पत्र, रोख रक्कम देऊन सन्मानित
सांगली :-
गेल्या वर्षी मे महिन्यात सांगली नजीकच्या तुंग येथील चांदोली वसाहतीत एका 8 वर्षीय बालिकेचा निर्घृण खून करण्यात आला होता.
या खून प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा नोंद झाला होता. तर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर यांनी करून त्या बालकाविरुध्द सबळ पुरावा हस्तगत करुन मा.बाल न्यायालयत गुन्हयाचा दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. या केसचे कामकाज जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख व कोर्ट कडील पैरवी म्हणून काम पाहणारे पोहेकॉ/ गणेश वाघ, मपोहेकॉ/ रमा डांगे, मपोना/ वंदना पवार यांनी पाहिले. या गुन्हयातील एकुण १४ साक्षीदार तपासण्यात आले. या गुन्हयाचा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर यांनी उत्कृष्ठ तपास केल्याने बालअपचारी आरोपी यास १२ वर्षे सक्त मजुरी शिक्षा झाली आहे. सदर केस चा निकाल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय श्री सातवळेकर कोर्ट सो यांनी दिनांक ६.५.२०२१ रोजी दिला, बालअपचारी यास अश्या प्रकारच्या गंभीर गुन्हयात शिक्षा होण्याची देशातील पहिलीच घटना आहे.
या गुन्हयातील तपासी अधिकारी श्री अशोक विरकर तसेच गुन्हयाचे तपासकामी मदत करणारे सपोफो महेश अष्टेकर, पोहेकॉ/ सिकंदर तांबोळी, जावेद मुजावर, तसेच सदर केसेचे सुनावणी वेळी न्यायलयीन कामकाजात कोर्ट पैरवी म्हणून काम पाहणारे पोहेकॉ/ गणेश वाघ, मपोहेकॉ/ रमा डांगे, मपोना/ वंदना पवार आदींचा पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम आणि अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले मॅडम याचे हस्ते प्रशस्ती प्रसंशापत्र व अमलंदार याना प्रत्येकी १०,०००/- रुपये रोख रक्कम देऊन गौरवण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी सर्जेराव गायकवाड यांनी दिली.
Comments
Post a Comment