कर्नाळ, इनाम धामणी येथे औषधांचे किट वाटप ; गुलाबराव पाटील हॉस्पिटल, पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा उपक्रम
सांगली -
गुलाबराव पाटील होमिओपॅथिक हॉस्पिटल आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने कर्नाळ आणि इनाम धामणी येथे गृह अलगीकरणातील कोरोना रुग्ण आणि कुटुंबासाठी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते औषधांचे किट वाटप करण्यात आले. या गावांनी सुरू केलेल्या कोरोना उपचार केंद्रांनाही त्यांनी भेटी दिल्या.
कर्नाळ येथील किट वाटपाच्यावेळी सरपंच सौ. संध्या कांबळे, उपसरपंच युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील, संतोष मिसाळ, राजेश एडके, नाना घोरपडे, गणेश घोरपडे, अमोल पाटील, रावसाहेब मोहिते, सचिन पाटील, सुनिता कारंडे, वैभव बंडगर, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment