महाराष्ट्रातील पत्रकारांना ५०० रु कोटीचे पेकेज जाहीर करावे - महाराष्ट्र पत्रकार संघ
सांगली -
राज्य शासनाने कोरोना काळात सर्व उद्योग क्षेत्रातील घटकांना मदत जाहीर केली ही उल्लेखनिय बाब आहे.परंतु या कोरोना काळात देशाचा चौथा स्थंब दुर्लक्षित आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रतील सर्व पत्रकार यांच्या उदरनिर्वाह करीता किमान ५०० कोटी रु कोरोना काळातील मदत जाहीर करून सर्व पत्रकार यांच्या खात्यावर १०,००० रू जमा करावी अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे ईमेल आंदोलन द्वारे केली आहे.
कोरोना काळात पत्रकार यांच्यावर अत्यंत आर्थिक बिकट परिस्थिती ओढवली आहे. छोटी मोठी दैनिक वृत्तपत्र पडण्याच्या मार्गावर आहेत. आजच्या या भयानक कोरोना काळात पत्रकार यांची व्यथा काळजाला पाझर फुटणारी ठरली असून समाजाला दिशा देणारा पत्रकार आज पोटाची खळगी भरण्यासाठी दिशाहीन झाला आहे.
राज्यशासनाने या कोरोना काळातील पत्रकारितेला जीवदान देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पत्रकार यांना किमान ५०० रु कोटीचे पेकेज जाहीर करून पत्रकार यांच्या खात्यावर प्रत्येकी १०,००० रु वर्ग करून त्याची अंमलबजावणी करावी ही नम्र व कळकळीची विनंती .
अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाने केली आहे. राज्यातील छतीस जिल्यातून हजारो निवेदने पाठवण्यात आली.
Comments
Post a Comment