कडेगाव नगरपंचायतच्या वतीने कोरोना ला हरविण्यासाठी आशा वर्कर : अंगणवाडी सेविका यांना सर्व सुविधा देणार - सौ.संगीता राऊत,नगराध्यक्षा कडेगाव

 कडेगाव : 

              परवेझ तांबोळी नगरपंचायत कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज असून आशा वर्कर,अंगणवाडी सेविका यांना नगरपंचायत मार्फत मास्क ,सॅनिटायजर,हॅन्डग्लोज सुविधा देण्यात येत असून त्यांच्या माध्यमातून सर्व कडेगाव  शहरातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईक  यांच्याशी संपर्क साधून ब्रेक द चेन करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत,आज नगरपंचायत सभागृहामध्ये आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांची मीटिंग घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत,

      


         या महामारी विरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी घरी सुरक्षित राहून प्रशासनास सहकार्य करावे कोरोनाची काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करावी, भीती बाळगू नका.मास्क सॅनिटायजर चा सतत वापर करा हात स्वच्छ धूत जावा आणि सुरक्षित अंतर ठेवा, आम्ही सर्व जण आपल्याबरोबर आहोत. 
       लवकरच परगावहून कडेगाव शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांची तपासणी केल्याशिवाय त्यांना प्रवेश देणार नाही असा निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे कडेगाव शहर सुरक्षित राहील
      आज झालेल्या मिटींगला मुख्याधिकारी कपिल जगताप,मंडल अधिकारी मल्हारी कारंडे,तलाठी देवयानी कुलकर्णी, राजेंद्र राऊत,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका उपस्थीत होत्या.

Comments

Popular posts from this blog

वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला

कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच; भिलवडीमध्ये मृत मासे