Posts

Showing posts from June, 2021

सांगली महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी दत्तात्रय लांघी.

Image
  सांगली -  महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी दत्तात्रय लांघी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अहमद नगरचे  जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून दत्तात्रय लांघी सेवेत आहेत. त्यांना पदोन्नतीवर सांगली मिरज कुपवाड शहरमहापालिकेचे  अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश शासनाने दोन दिवसापुर्वी काढला आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी यापुर्वी यशवंत माळी होते. मात्र त्यांची नियुक्ती खास बाब म्हणून केली होती. त्यावेळी  शासनाने या पदाची निर्मिती केलेली नव्हती. नंतर शासनानेच ड वर्ग महापालिकांसाठी अतिरिक्तआयुक्त पद निर्माण केले.  त्यानंतर सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेत हे पद भरले गेले नव्हते. श्री. लांघी यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळणार आहे.

कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच; भिलवडीमध्ये मृत मासे

Image
  भिलवडी - कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच पडल्याचे दिसून येत असून, कृष्णा नदीकाठ परिसरातील कारखान्यातून सोडलेल्या रसायनयुक्त पाण्यामुळेच कृष्णा नदी पात्रातील मासे मृत झाल्याची चर्चा कृष्णाकाठी रंगली आहे. कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे.याचा फायदा घेत कारखानादारांनी कारखान्यातील रसायनयुक्त पाणी कृष्णा नदी पात्रामध्ये सोडले असल्यामुळे जलचर प्राण्यांना धोका निर्माण होत आहे.नदी पात्रातील मासे या रसायन मिश्रित पाण्यामध्ये मृत्यूमुखी पडत असून नागठाणे,आमणापूर, अंकलखोप, औदुंबर, भिलवडीसह कृष्णाकाठावरील इतर गावांमध्ये कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच पडल्याचे दिसून येत आहे.अनेक गावातील लोक नदी किनारी आलेल्या माशांना पकडण्यासाठी नदी किनारी गर्दी करीत आहेत.या रसायनयुक्त पाण्यामुळे जलचर प्राण्यांबरोबरच मानवांच्या आरोग्यासही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे प्रशासनाने संबंधित घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कृष्णाकाठच्या नागरिकांमधून होत आहे.

डॉ. अच्युत गोडबोले यांचे ऑनलाईन व्याख्यान ;पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा उपक्रम.

Image
सांगली - प्रसिद्ध लेखक आणि आयटी तज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांचे 'उद्याचे बदलणारे तंत्रज्ञान आणि आपण' या विषयावर उद्या रविवार, दि. २० जून रोजी सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. पृथ्वीराज पाटील फाउंडेशन, सांगली यांच्यावतीने हा उपक्रम होत आहे. या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. जग वेगानं बदलत आहे, कोविड नंतर शिक्षणाचे काय होणार, नोकऱ्यांचे काय होणार? नव्या स्पर्धेत कसे टिकायचे याबद्दल  असंख्य प्रश्न सांगली-मिरज-कुपवाड करांच्या मनात आहेत. या प्रश्नांची जाणीव असल्याने सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी या संदर्भात मार्गदर्शन मिळावे, येणारे जग कसे असेल हे समजून घ्यावे, या उद्देशाने डॉ. अच्युत गोडबोले यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. अच्युत गोडबोले हे पटनी कम्प्युटर्सचे प्रमुख होते व गेल्या काही वर्षातील मुसाफिर, बोर्डरूम, अर्थात अशा अनेक बेस्टसेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. विविध विषयांवरील त्यांचा अभ्यास सर्वाना परिचीत आहे. असे दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याशी झूम मीटिंगवर संवाद साधणार आहे...
Image
म्युकरमायकोसीस आजारावर महात्मा जोतिबा फुले जणआरोग्य योजनेअंतर्गत मोफत  उपचार      विकास धाइंजे व वैभव गिते ही जोडी पुन्हा एकदा राज्यातील गरीब जनतेच्या पाठीशी.   सातारा - राज्यातील जनता कोरोना कोविड 19 या विषाणूशी लढत असतानाच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या आजाराचे संकट जनतेवर येऊन ठेपले आहे.या आजाराचे उपचार व औषधे महागडी असल्याने याचा खर्च सामान्य कुटूंबांना परवडणारा नाही ही गंभीर बाब लक्षात घेऊन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सचिव वैभव गिते यांनी मुख्यमंत्री व सार्वजनिक आरोग्यमंत्री यांच्याकडे म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या आजाराचे महात्मा जोतीबा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार करावेत म्हणून निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.याची दखल शासनाने घेऊन  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 18 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत म्युकरमायकोसिस (Mucormycosis) ...
Image
  हे ही बदलणार आहे ... या विश्वासाने...  आनंदाने जगा - प्रा.दामोदर मोरे कल्याण( आशा रणखांबे) - " अंधारा नंतर उजेड येतो.दुःखा नंतर सुख येते.जीवन हा ऊन सावल्यांचा खेळ आहे.नीत्य काहीच नसते.त्यामुळे या महामारीच्या काळात ' हे ही बदलणार आहे, हे ही बदलणार आहे...!'असा सातत्याने विचार करीत सजगपणे,आनंदाने जगा.सजगता,सकारात्मकता आणि हिम्मत हेच या दुखण्यावरचे औषध आहे." असे प्रतिपादन ख्यातनाम हिंदी- मराठी साहित्यिक प्रा.दामोदर मोरे यांनी केले.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन हिंदी अध्यापक संघाने आभासी मंचावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ' आनंदमय जीवन जीने की कला ' या विषयावर ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संघाचे राजाध्यक्ष डाॅ.मिलिंद कांबळे हे होते.            प्रा.मोरे पुढे म्हणाले कि, " ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट अधिक क्रियान्वित होत रहाते.महामारीच्या काळात लोक ' भीती ' या विषयावर जास्तच लक्ष केंंद्रित करीत असल्याने त्यांची भीती वाढतच चाललेली आहे.ते दुःखी आहेत.' मी सावध आहे.सतर्क आहे.मी हात सॅनेटाईझ करतो.मास्क लावतो.अंतर पाळतो.त्यामुळ...