डॉ. अच्युत गोडबोले यांचे ऑनलाईन व्याख्यान ;पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा उपक्रम.
सांगली - प्रसिद्ध लेखक आणि आयटी तज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांचे 'उद्याचे बदलणारे तंत्रज्ञान आणि आपण' या विषयावर उद्या रविवार, दि. २० जून रोजी सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. पृथ्वीराज पाटील फाउंडेशन, सांगली यांच्यावतीने हा उपक्रम होत आहे. या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. जग वेगानं बदलत आहे, कोविड नंतर शिक्षणाचे काय होणार, नोकऱ्यांचे काय होणार? नव्या स्पर्धेत कसे टिकायचे याबद्दल असंख्य प्रश्न सांगली-मिरज-कुपवाड करांच्या मनात आहेत. या प्रश्नांची जाणीव असल्याने सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी या संदर्भात मार्गदर्शन मिळावे, येणारे जग कसे असेल हे समजून घ्यावे, या उद्देशाने डॉ. अच्युत गोडबोले यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. अच्युत गोडबोले हे पटनी कम्प्युटर्सचे प्रमुख होते व गेल्या काही वर्षातील मुसाफिर, बोर्डरूम, अर्थात अशा अनेक बेस्टसेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. विविध विषयांवरील त्यांचा अभ्यास सर्वाना परिचीत आहे. असे दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याशी झूम मीटिंगवर संवाद साधणार आहे. या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे,
Join Zoom Meeting
Meeting ID: 817 6272 0326
Passcode: 12345
Comments
Post a Comment