सांगली महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी दत्तात्रय लांघी.

 


सांगली -  महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी दत्तात्रय लांघी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अहमद नगरचे 
जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून दत्तात्रय लांघी सेवेत आहेत. त्यांना पदोन्नतीवर सांगली मिरज कुपवाड शहरमहापालिकेचे 
अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
याबाबतचा आदेश शासनाने दोन दिवसापुर्वी काढला आहे.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी यापुर्वी यशवंत माळी होते. मात्र त्यांची नियुक्ती खास बाब म्हणून केली होती. त्यावेळी 
शासनाने या पदाची निर्मिती केलेली नव्हती. नंतर शासनानेच ड वर्ग महापालिकांसाठी अतिरिक्तआयुक्त पद निर्माण केले. 
त्यानंतर सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेत हे पद भरले गेले नव्हते. श्री. लांघी यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेला
अतिरिक्त आयुक्त मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला

कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच; भिलवडीमध्ये मृत मासे