नागोठणे विभागातील विविध विद्यालयांचा दहावी बोर्ड परीक्षेचा 100% निकाल

 नागोठणे विभागातील विविध विद्यालयांचा दहावी बोर्ड परीक्षेचा 100% निकाल


नागोठणे
:  इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवार दि. 16 जुलै रोजी जाहीर झाला असून नागोठणे येथील 1) को.ए.सो.च्या अग्रवाल विद्यामंदिरचा एकूण निकाल 100% लागला. यामध्ये एकूण 153 सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होवून निकाल  % लागला असून प्रथम क्रमांक अक्षता संजय खाडे93.20%द्रुतीय क्रमांक गौरी श्रीरंग बोरकर,87.60 %तृतीय क्रमांक- प्रिन्स कृष्णा ठाकुर,86.60% गुण मिळाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कॉलेजचे चेअरमन नरेंद्र जैनप्रभारी मुख्याध्यापक उल्लास ठाकूरशिक्षक प्रतींनिधी यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

2) भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस.डी.परमार स्कूलचा एकूण निकाल 100% लागला. त्यामध्ये एकूण 34 सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम क्रमांक- रिया नबकुमार हलदार,85.40 %, द्रुतीय क्रमांक दिशा गणेश लवटे व गायत्री ललित सोलंकी,83.20 %तृतीय क्रमांक भूमी हिरा देब,82.00 % गुण मिळाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन / अध्यक्ष किशोर जैन सर्व संचालक तसेच मुख्याध्यापक यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

3) नागोठणे रिलायन्स फाउंडेशनचा एकूण निकाल 100% लागला. त्यामध्ये एकूण सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम क्रमांक सिद्धि गणपत दिगे,91.40 %, द्रुतीय क्रमांक विराज अजित शेळके,81.80 %तृतीय क्रमांक सेजल सुरेन्द्र पाटील,80.20% गुण मिळाले आहेत.. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे रिलायन्सचे प्रेसिडंट अविनाश श्रीखंडेकॉलेजचे चेअरमन चेतन वाळंजमुख्याध्यापिका सीमा कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

4) नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू कॉलेजचा एकूण निकाल 100 % लागला. त्यामध्ये सर्वच 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम क्रमांक- सिनीन साजिद अधिकारी 94.20%,साना सिकंदर शेखद्रुतीय क्रमांक-92.20%तृतीय क्रमांक- अरमा अल्ताफ पोत्रिक 89.40% गुण मिळविले आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कॉलेजचे चेअरमन समद अधिकारी,व्हा.चेअरमन सलाम अधिकारीसेक्रेटरी लियाकत कडवेकर,संचालक- ,डॉ.सादिया दफेदार,शबबीर पानसरे,सगिर अधिकारी तसेच मुख्याध्यापक इर्शाद कुणके व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

5) होली एन्जलचा एकूण निकाल 100% लागला. त्यामध्ये एकूण सर्वच 58 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम क्रमांक रोहित राजेंद्र खरीवले,95.20%, द्रुतीय क्रमांक आमिना साबील अहमद खान,92.80%तृतीय क्रमांक सोहम शैलेश पिसाट,91.00% गुण मिळाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्कूलचे चेअरमन विजय मुलूकवाडमुख्याध्यापिका सीमा मुलूकवाड ,उपमुख्याध्यापिक मुकेश मिसाळ एच.एम. नीलिमा राणे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला

कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच; भिलवडीमध्ये मृत मासे