सांगलीत कृष्णेची पातळी 27 फुटावर
महापालिका प्रशासन पूर पट्ट्यात दाखल; नागरिकाना स्थलांतरित होण्याचे आवाहन
सांगली : सांगलीत संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता आणि पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने सांगली महापालिकेकडून कृष्णा काठच्या पूर पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होणेचे आवाहन केले जात आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह टीम पूर पट्ट्यात फिरून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
कोयना धरणातील विसर्ग आणि सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सांगलीत सायंकाळी 7 च्या सुमारास पूर पातळी 27 वर पोहचल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून तातडीच्या खबरदारी म्हणून पूर पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या देण्यात आल्या. रात्रीत पाणी पातळी वाढण्याची शक्यता आल्याने पुराच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या सुर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनीमध्ये महापालिका उपायुक्त राहुल रोकडे आणि टीमकडून मेगा फोनद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होणेचे आवाहन केले आहे. याचबरोबर ज्यांच्याकडे राहानेची सोय नाही अशा नागरिकांसाठी महापालिकेने साखर कारखाना शाळा क्रमांक 14 आणि शाळा क्रमांक 24 या दोन ठिकाणी तात्पुरता निवारा केंद्र सुरू केले आहे. तसेच पूर पट्ट्यातील जनावरे सुद्धा सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याबाबत सूचना देण्यात आलाय. रात्रीत पाणी पातळी वाढणार असल्याने महापालिका प्रशासन सज्ज झाले असून महापालिकेचे वैद्यकीय, आपत्कालीन तसेच अग्निशमन विभागाकडून पूर स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. उपायुक्त राहुल रोकडे यांनी स्थानिक नागरिकांना संभाव्य परिस्थितीची माहिती देत वेळीच स्थलांतर होणेचे आवाहन केले. यावेळी मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणिल माने, किशोर कांबळे, गणेश माळी , प्रमोद रजपूत आदींनी पुरपट्ट्यात फिरून नागरिकांना स्थलांतर करण्याचे आवाहन केले. यांच्यासह महापालिका कर्मचारी पूर पट्ट्यात लक्ष ठेऊन आहेत.
Comments
Post a Comment