डॉ.सुरेश भोसले यांचा संग्राम देशमुख यांच्या हस्ते सत्कार
य.मो.कृष्णा कारखाना येथे सहकार पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा सत्कार
कडेपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक २०२१-२०२६ जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने १२,२२० मतांनी विजयी मिळविला त्याबद्दल य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ.सुरेश बाबा भोसले व डॉ.विनायक बाबा भोसले यांचा सत्कार सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख (भाऊ) यांच्या हस्ते करण्यात आला.
य.मो.कृष्णा कारखाना येथे सहकार पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा संग्राम देशमुख यांच्या कडून सत्कार सभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले की, कृष्णेच्या इतिहासातील ही ऐतिहासिक निवडूक झाली आहे. सभासदांनी मोठा विश्वास दाखवून कारखान्याची सत्ता जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या हातात दिली आहे. मताधिक्य जास्त मिळाल्याने जबाबदारी ही वाढली आहे. तरी देशमुख कुटुंबीय भोसले कुटुंबा बरोबर उभे राहून सभासदांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.संग्राम देशमुख यांनी सर्व विजयी उमेदवारांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .डाॅ.सुरेश भोसले म्हणाले की, सभासदांनी कारखान्याचे हित जपत सर्व गटातून मतदानाची टक्केवारी वाढवून मताध्यिकात अग्रेसर ठेवत सभासदांनी विजयाचे रेकाॅड केले आहे.कडेगाव तालुक्यातील प्रत्येक सभासद गावातूनही मोठे मताधिक्य पँनेलला मिळाले आहे. यामध्ये देशमुख बंन्धूचे योगदान मोठे आहे.गेल्या सहा वर्षात सभासदांचे हित जोपासले आहे, त्यामुळे सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवून प्रचंड मतांनी विजयी केले. त्यांच्या विश्वासास पात्र राहून पुढील काळातही काम करून कृष्णा कारखाना आघाडीवर राहिल यासाठी प्रयत्न केले जातील असे ही ते म्हणाले. यावेळी भालचंद्र देशमुख, युवा नेते विश्वतेज संग्राम देशमुख (दादा), अँड दिपक थोरात, संपतराव देशमुख को-ऑप मिल्क युनियन लिमिटेड कडेपुरचे चेअरमन तानाजी जाधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment