माजी नगरसेवक परशुराम मोरे यांच्याकडून घडले माणुसकीचे दर्शन

 


माजी नगरसेवक परशुराम मोरे यांच्याकडून घडले माणुसकीचे दर्शन


जत : 


काही दिवसांपूर्वी सकाळी 11 वाजताची घटना. जत शहरातील जत-सांगोला महामार्गालगत संतोष पेट्रोल पंप शेजारी एक वयस्कर वृद्ध 
मृत्यू अवस्थेत असल्याचे युवक नेते फिरोज नदाफ याच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ माजी बांधकाम सभापती
तथा जागर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे याना फोन वरून सांगितले. त्यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तात्काळ
 घटनास्थळी दाखल होत, घटनेची माहिती घेतली व त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. यावेळी जतचे कर्तव्यदक्ष मंडळ
 अधिकारी संदीप मोरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल मदने, पांडुरंग सूर्यवंशी, पत्रकार जॉकेश आदाटे आदीजण उपस्थित होते. मोरे व मदने 
यांनी सदर घटनेची माहिती जत पोलिस ठाण्यात करण्यात आली. तात्काळ जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व 
पंचनामा करण्यात आला. यावेळी मृत व्यक्तीची पत्नी व मुलगा घटनास्थळी दाखल झाले होते. आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचे पाहून 
आईला अश्रू अनावर झाले. यावेळी मोरे यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जत ग्रामीण रुग्णालयात 
घेऊन जाण्यासाठी माजी नगरसेवक महादेव कोळी व अशोक बन्नेनवर यांच्याशी संपर्क साधून गाडीची व्यवस्था केली. शवविच्छेदन
 झाल्यानंतर स्वतः परशुराम मोरे हे स्मशानभूमी मध्ये दाखल झाले होत. सर्व अंत्यविधी आटपून कुटुंबीयांना धीर देण्याचे काम केले.
 त्याचबरोबर घरातील कर्ता पुरुष गेल्याने आम्ही कसं जीवन जगायचं असे मृतांची पत्नी यांनी परशुराम मोरे यांना सांगताच मोरे यांनी
 मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

Comments

Popular posts from this blog

वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला

कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच; भिलवडीमध्ये मृत मासे