आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका


  लोणकर कुटुंबियाना दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर

स्वप्नीलच्या बहिणीला सक्षम करण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश

             मुंबईआम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत..काळजी करू नका,’अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला.

स्वप्नील लोणकर यांचे आईवडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आईवडीलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलच्या बहिणीला करता येईलती सर्व मदत केली जाईलअसे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेउद्योग मंत्री सुभाष देसाईपाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलराज्यमंत्री संजय बनसोडेखासदार सर्वश्री अनिल देसाईविनायक राऊतशिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकरसामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आई सौ. छायावडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. घटना दुर्देवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नकाअसा धीर श्री.ठाकरे यांनी दिला.

Comments

Popular posts from this blog

वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला

कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच; भिलवडीमध्ये मृत मासे