जिल्हा परिषद शाळा मधील खोल्यांची तात्काळ दुरुस्ती करा.

 जिल्हा परिषद शाळा मधील खोल्यांची तात्काळ दुरुस्ती करा.



कुपवाड:(हॅलो प्रभात ) :
कुपवाड अहिल्यानगर जिल्हा परिषद मुलांची शाळा पुढील बाजूस असणाऱ्या 6 खोल्याची अत्यंत दुरावस्था व पडझड झालेली असून ते धोकादायक बनले आहे.कित्येक वर्ष या शाळेकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष दिले नसलेने हया शाळेची अवस्था अशोभनीय झालेले आहे.

आता जिल्हा परिषद शाळेच्या ऑनलाइन तास सुरु झालेले असताना अक्षरशः येथील शिक्षक लोकांना बसण्यासाठी जागा ही शिल्लक नाही.शाळेच्या प्रत्येक खोलीमधील कौले फुटलेले अवस्थेत आहेत त्यामुळे आता पड़त असलेल्या पावसाने प्रत्येक खोलीत पाणीच पाणी झाले आहे.शाळेमध्ये असणारे महत्वाची कागदपत्रे भिजून खराब होण्याची शक्यता आहे..

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एखादी गंभीर घटना घडू शकते तत्पूर्वी या इमारतीची दुरुस्ती तात्काळ करावी यासाठी कुपवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने आज जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.प्राजक्ता कोरे यांना निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर शाळेच्या खोल्यांची दुरुस्ती न केल्यास कुपवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला..

यावेळी कुपवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी मा. शुभम जाधव, आमीन शेख ऋषिकेश कांबळे मनोज हेगडे तेजस पाटील सम्मेद पाटील आदी उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला

कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच; भिलवडीमध्ये मृत मासे