Posts

सांगलीत कृष्णेची पातळी 27 फुटावर

Image
  महापालिका प्रशासन पूर पट्ट्यात दाखल; नागरिकाना स्थलांतरित होण्याचे आवाहन  सांगली : सांगलीत संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता आणि पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने सांगली महापालिकेकडून कृष्णा काठच्या पूर पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होणेचे आवाहन केले जात आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह टीम पूर पट्ट्यात फिरून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.       कोयना धरणातील विसर्ग आणि सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सांगलीत सायंकाळी 7 च्या सुमारास पूर पातळी 27 वर पोहचल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून तातडीच्या खबरदारी म्हणून पूर पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या देण्यात आल्या. रात्रीत पाणी  पातळी वाढण्याची शक्यता आल्याने पुराच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या सुर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनीमध्ये महापालिका उपायुक्त राहुल रोकडे आणि टीमकडून मेगा फोनद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होणेचे आवाहन केले आहे. याचबरोबर ज्यांच्याकडे राहानेची सोय नाही अशा नागरिकांसाठी महापा...

जिल्हा परिषद शाळा मधील खोल्यांची तात्काळ दुरुस्ती करा.

Image
  जिल्हा परिषद शाळा मधील खोल्यांची तात्काळ दुरुस्ती करा. कुपवाड :( हॅ लो प्रभात ) : कुपवाड अहिल्यानगर जिल्हा परिषद मुलांची शाळा पुढील बाजूस असणाऱ्या 6 खोल्याची अत्यंत दुरावस्था व पडझड झालेली असून ते धोकादायक बनले आहे.कित्येक वर्ष या शाळेकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष दिले नसलेने हया शाळेची अवस्था अशोभनीय झालेले आहे. आता जिल्हा परिषद शाळेच्या ऑनलाइन तास सुरु झालेले असताना अक्षरशः येथील शिक्षक लोकांना बसण्यासाठी जागा ही शिल्लक नाही.शाळेच्या प्रत्येक खोलीमधील कौले फुटलेले अवस्थेत आहेत त्यामुळे आता पड़त असलेल्या पावसाने प्रत्येक खोलीत पाणीच पाणी झाले आहे.शाळेमध्ये असणारे महत्वाची कागदपत्रे भिजून खराब होण्याची शक्यता आहे.. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एखादी गंभीर घटना घडू शकते तत्पूर्वी या इमारतीची दुरुस्ती तात्काळ करावी यासाठी कुपवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने आज जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.प्राजक्ता कोरे यांना निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर शाळेच्या खोल्यांची दुरुस्ती न केल्यास कुपवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.. यावेळी कुपवाड राष्ट्रवादी...

नागोठणे विभागातील विविध विद्यालयांचा दहावी बोर्ड परीक्षेचा 100% निकाल

Image
  नागोठणे विभागातील विविध विद्यालयांचा दहावी बोर्ड परीक्षेचा 100% निकाल नागोठणे :    इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवार दि. 16 जुलै रोजी जाहीर झाला असून नागोठणे येथील   1)   को.ए.सो.च्या अग्रवाल विद्यामंदिर चा   एकूण निकाल 100% लागला. यामध्ये एकूण 153 सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होवून निकाल   % लागला असून प्रथम क्रमांक – अक्षता संजय खाडे ,  93.20% ,  द्रुतीय क्रमांक – गौरी श्रीरंग बोरकर ,87.60  % ,  तृतीय क्रमांक- प्रिन्स कृष्णा ठाकुर , 86.60% गुण मिळाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कॉलेजचे चेअरमन नरेंद्र जैन ,  प्रभारी मुख्याध्यापक उल्लास ठाकूर ,  शिक्षक प्रतींनिधी यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले. 2)   भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या   एस.डी.परमार स्कूल चा एकूण निकाल 100% लागला. त्यामध्ये एकूण 34 सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम क्रमांक- रिया नबकुमार हलदार , 85.40  %,  द्रुतीय क्रमांक – दिशा गणेश लवटे व गायत्री ललित सोलंकी ,83.20  % ,  तृतीय क्रमांक ...

आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका

Image
  लोणकर कुटुंबियाना दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर स्वप्नीलच्या बहिणीला सक्षम करण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश                मुंबई -  आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत..काळजी करू नका ,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला. स्वप्नील लोणकर यांचे आई ,  वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आई ,  वडीलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलच्या बहिणीला करता येईल ,  ती सर्व मदत केली जाईल ,  असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ,  उद्योग मंत्री सुभाष देसाई ,  पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील ,  राज्यमंत्री संजय बनसोडे ,  खासदार सर्वश्री अनिल देसाई ,  विनायक राऊत ,  शिवसेनेच...

आयकर विभागात विविध पदासाठी खेळाडू भरती- जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे

Image
    सांगली    : केंद्र शासनाच्या आयकर विभागात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूकरीता विविध पदासाठी खेळाडू भरती होणार आहे. यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, शालेय राष्ट्रीय स्पर्धा सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा खेळलेल्या पात्र खेळाडूंनी कामगिरी प्रमाणित करण्यासाठीचे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे.             यासाठी खेळाडूंनी त्यांनी मिळविलेल्या क्रीडा प्राविण्याची प्रमाणपत्रे संबंधित प्राधिकरणाकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी आपली प्रमाणपत्रे आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावयाची आहेत. सद्यपरिस्थितीत कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भावाचा विचार करता राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी व्यक्तीश: पुणे येथे उपस्थित ...

माजी नगरसेवक परशुराम मोरे यांच्याकडून घडले माणुसकीचे दर्शन

Image
  माजी नगरसेवक परशुराम मोरे यांच्याकडून घडले माणुसकीचे दर्शन जत :  काही दिवसांपूर्वी सकाळी 11 वाजताची घटना. जत शहरातील जत-सांगोला महामार्गालगत संतोष पेट्रोल पंप शेजारी एक वयस्कर वृद्ध  मृत्यू अवस्थेत असल्याचे युवक नेते फिरोज नदाफ याच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ माजी बांधकाम सभापती तथा जागर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे याना फोन वरून सांगितले. त्यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तात्काळ  घटनास्थळी दाखल होत, घटनेची माहिती घेतली व त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. यावेळी जतचे कर्तव्यदक्ष मंडळ  अधिकारी संदीप मोरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल मदने, पांडुरंग सूर्यवंशी, पत्रकार जॉकेश आदाटे आदीजण उपस्थित होते. मोरे व मदने  यांनी सदर घटनेची माहिती जत पोलिस ठाण्यात करण्यात आली. तात्काळ जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व  पंचनामा करण्यात आला. यावेळी मृत व्यक्तीची पत्नी व मुलगा घटनास्थळी दाखल झाले होते. आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचे पाहून  आईला अश्रू अनावर झाले. यावेळी मोरे यांनी त्यांना धीर देण...

डॉ.सुरेश भोसले यांचा संग्राम देशमुख यांच्या हस्ते सत्कार

Image
  य.मो.कृष्णा कारखाना येथे सहकार पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा  सत्कार     कडेपूर :   यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक २०२१-२०२६ जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने १२,२२० मतांनी विजयी मिळविला त्याबद्दल य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ.सुरेश बाबा भोसले व डॉ.विनायक बाबा भोसले यांचा सत्कार सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख (भाऊ) यांच्या हस्ते करण्यात आला. य.मो.कृष्णा कारखाना येथे सहकार पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा संग्राम देशमुख यांच्या कडून सत्कार सभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले की, कृष्णेच्या  इतिहासातील ही ऐतिहासिक निवडूक झाली आहे. सभासदांनी मोठा विश्वास दाखवून कारखान्याची सत्ता जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या हातात दिली आहे. मताधिक्य जास्त मिळाल्याने जबाबदारी ही वाढली आहे. तरी  देशमुख कुटुंबीय भोसले कुटुंबा बरोबर उभे राहून सभासदांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे देशमुख यांनी...