Posts

Showing posts from April, 2021

क्षत्रिय मराठा संघटनेच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांना मानपत्र देऊन सन्मान

Image
इचलकरंजी -                           क्षत्रिय मराठा संघटना यांच्या  वतीने इचलकरजीचे लोकप्रिय आमदार मा श्री प्रकाश आवाडे आण्णा  यांनी कोरोना च्या काळात इचलकरजी शहर व मतदारसंघ मध्ये अनेक उपाय योजना व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बदल मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला,  त्यावेळी मा श्री डॉ.राहूल आवाडे जिल्हा परिषद सदस्य साहेब, श्री बाळा साहेब कलागते माजी उपनगराध्यक्ष, श्री आरोग्य सभापती संजय केगार साहेब, श्री सुनिल पाटील नगरसेवक साहेब, श्री महमद मुजावर, डॉ राजू मगदूम संरपच माणगाव, श्री संजय आरेकर, श्री किशोर निंबाळकर , श्री उत्तम चौगुले, श्री स्वप्निल पाटील, श्री उमेश गोरे, श्री दिपक येलाजे , श्री उदय निकम, श्री राज चव्हाण, श्री शिवाजी कांबळे, श्री विजय पोवळे क्षत्रिय मराठा संघटना व ताराराणी पक्ष नेते व पदाधिकारी उपस्थित होते.  

रांझणीचे सुपुत्र आण्णासाहेब शिंदे यांची सहाय्यक पोलिस पदी पदोन्नती

Image
  पंढरपूर -     पंढरपूर तालुक्यातील रांझणी गावचे सुपुत्र आण्णासाहेब शिंदे यांची नुकतीच सहाय्यक पोलिस निरीक्षक(API) पदी नियुक्ती झाली आहे.या अगोदर ते कोल्हापूर येथे पोलिस उपनिरीक्षक पदी कार्यरत होते.तेथील कार्याचा आढावा घेऊन त्यांची गडचिरोली परिक्षेत्रात सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) पदी नियुक्ती झाली आहे.  याबद्दल रांझणी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. पोलिस कर्मचारी ते सहाय्यक पोलिस पदापर्यत भरारी घेणारे आण्णासाहेब शिंदे हे एक संयमी पण धडाकेबाज कारवाई करणारे पोलिस अधिकारी सर्वपरिचित आहेत.पोलिस दलात काम करत असताना त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे याच कार्याची दखल घेऊन त्यांना पदोन्नती मिळाली आहे. Attachments area

सांगली महापालिका क्षेत्रात गुरुवारी 314 नवे कोरोना पॉझिटिव्ह : लक्षणे असणाऱ्यांनी तपासणी करून घ्यावी - आयुक्त

Image
सांगली  -   सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी दिवसभरात 314 व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर दिवसभरात 155 व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये दाखल झाले आहेत. मनपाक्षेत्रात 29 एप्रिल 2021 अखेर एकूण 2023 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 1588 व्यक्ती या होम आयसोलेशनमध्ये तर उर्वरित वेगवेगळ्या कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जनतेने काळजी घ्यावी आणि लक्षणे असणाऱ्यानी आपली कोविड तपासणी करून घ्यावी असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.    सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी  दिवसभरात 314 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत तर यापैकी 155 जन होमयसोलेशनमध्ये आहेत. आजचे एकूण ऍक्टिव्ह रुग्ण 2023 असून यापैकी 1588 व्यक्ती होम आयसोलेशन उपचारखाली आहेत तर 177 व्यक्तीना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनपाक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे जनतेने काळजी घ्यावी. कोणाला कोरोना सदृश्य लक्षणे असतील तर त्या...
Image
                लॉकडाऊनमुळे सोनेवाडी गावात सुकसकाट     कोपरगाव  (मधुकर वक्ते) -  राज्य सरकारने जाहीर केलेल्या  लॉकडाऊनला कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील सर्व लहान मोठे व्यापार किराणा दुकानदार यांनी स्वःय स्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवल्याने गावात सुकसुकाट जाणवत होता .  लॉक डाउन शंभर टक्के यशस्वी झाल्याची माहीती सरपंच गंगाराम खोमने,उपसरपंच किशोर जावळे यांनी दिली.  गावाच्या विकासासाठी सोनेवाडी ग्रामपंचायत नेहमी प्रयत्न शिल असते इतर वेळी गावात परिसरातील नागरीकांची नेहमीच  वर्दळ असते.परंतु राज्य सरकारने सुरू केलेल्या या लॉकडाऊनमुळे सोनेवाडी नागरिकांसह लहान मोठया व्यापाऱ्यांनी घरातच रहाणे पसंत केल्याने कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होणार असुन  कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल अशी आशा सोनेवाडीचे सरपंच गंगाराम खोमने,उपसरपंच किशोर जावळे , यांनी व्यक्त केली आहे.

यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मस्थळास भेट आणि अभिवादन

Image
                                        यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मस्थळास भेट आणि अभिवादन आटपाडी   -   भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मस्थळी खानापूर - आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देवून या पवित्र वास्तू आणि चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन केले .  पलुस तालुक्यातील देवराष्ट्रे या गावी यशवंतराव चव्हाण साहेबांचा त्यांच्या आजोळी जन्म झाला होता . चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूस राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते आनंदराव बापु पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर आटपाडी विधान सभा मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, राष्ट्रवादीच्या सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत, सामाजीक न्याय विभागाचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब लि...

कुरुंदवाड नगरपालिका प्रशासनाचे नागरिकांना आवाहन.

Image
  कुरुंदवाड नगरपालिका प्रशासनाचे नागरिकांना आवाहन . कुरुंदवाड   -         कुरुंदवाड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शहरातील काही व्यापारी 11 वा नंतर ही दुकाने सुरू ठेवत आहेत. त्यांच्यावर दंडात्मक  कारवाई करणार असून जे  नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत त्यांची अँटीजन चाचणी करून त्यांच्यावर पाचशे रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याची  माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.         कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येथील पालिका सभागृहात मुख्याधिकारी जाधव,पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.      या  बैठकी जे व्यापारी  अत्यावश्यक सेवा वगळून 11वा. दुकाने चालू ठेवतील त्यांच्यावर थेट कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे ठरले  तर शहरात संचारबंदीचे उल्लंघन करून मास्क न वापरता विनाकारण फिरणारे नागरिक व दुचाकीस्वार यांची अँटीजन चाचण...