घाटमाध्यावरुन "कृष्णा" निवडणुकीसाठी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे तीन अर्ज . कडेपूर - पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल कडून घाटमाथ्यावरुन मा.आ.पृथ्वीराज देशमुख (बाबा ) व संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.रामचंद्र महाडीक (फौजी), श्री .भारत पाटील (काका) चिंचणी (अं) तर मोहिते वडगावचे श्री. अशोक देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवार रामचंद्र महाडीक (फौजी), भारत पाटील (काका),अशोक देशमुख यांच्या बरोबर प्रमोद पाटील,अशोक पाटील, प्रकाश पाटील, संजय देशमुख,अफजल मुजावर,सुधीर मोहिते, सुरेश मोहिते, सूचक कृष्णराव मोहिते, अनुमोदक शिवाआप्पा कार्यकर्ते सु.धो. मोहिते , राजू पाटील, फटेराव मोहिते, सुदाम काळे, शिवा काका मोहिते, किरण पाटील, भास्कर महाडीक,नामदेव महाडीक, जयंत पाटील, सोपानराव जाधव, उदयसिंह पाटील, राजेश महाडीक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Posts
Showing posts from May, 2021
पालकमंत्र्यांच्या हस्ते १३ रुग्णवाहिकांचे लोकार्पण
- Get link
- X
- Other Apps
पालकमंत्र्यांच्या हस्ते १३ रुग्णवाहिकांचे लोकार्पण. सातारा :- कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करता यावे यासाठी राज्य शासनाकडून सातारा जिल्ह्यासाठी १३ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज झालेल्या लोकार्पण कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून १३ रुग्णवाहिका मिळालेल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार असून भविष्यात या सुविधेचा चांगला उपयोग होईल, असा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला
- Get link
- X
- Other Apps
वेळापूर येथे पारधी समाजाच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला अकलूज(रमजान मुलाणी) - शुक्रवार दिनांक 28 मे रोजी गावठी दारू च्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस ताफ्यावर वेळापूर येथील विद्युत बोर्डाच्या पाठीमागील पारधी वस्तीच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक.भगवान खारतोडे हे गंभीररीत्या जखमी असून त्यांच्यावर सध्या अकलूज येथे उपचार सुरू आहेत, तसेच चालक कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके व हेडकॉन्स्टेबल दीपक मेहरकर हे जखमी झालेले आहेत. वेळापूर येथील चालू असलेल्या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी इन्स्पेक्टर भगवान खारतोडे हे प्रयत्नशील असून त्यांनी दोन पोलीस कॉन्स्टेबल व होमगार्ड यांना सोबत घेऊन छापेमारी ला गेले असता हा सगळा प्रकार घडून आला असल्याचे सांगितले जात आहे. अधिक तपास सुरू आहे . .
सांगली जिल्ह्याचे पोलिस उप अधीक्षक अजित टिके व सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगलीवाडी येथील रॉयल कृष्णा बोट क्लबला सदिच्छा भेट
- Get link
- X
- Other Apps
सांगली जिल्ह्याचे पोलिस उप अधीक्षक अजित टिके व सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगलीवाडी येथील रॉयल कृष्णा बोट क्लबला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी क्लब ने महापूर 2019 व कोरोना च्या महामारीमध्ये जे काम केले, त्याचे कौतुक केले. सर्व रेस्क्यू व अत्यावश्यक साहित्याची ची पाहणी केली. आणि येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन बाबत केलेल्या तयारीची पाहणी सुद्धा केली . महापुरातील नैसर्गिक आपत्तीत केलेल्या कामगिरी बद्दल रॉयल कृष्णा बोट क्लब च्या सर्व स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला. या वेळी बोट क्लब चे अध्यक्ष प्रताप जामदार, सचिव दत्ता पाटील, सहसचिव विनोद नलवडे तसेच रॉयल कृष्णा बोट क्लब चे सर्व पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.
शिरोळ गावठाण विस्तार वाढीचा प्रश्न अंतिम टप्प्यात : सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतला आढावा
- Get link
- X
- Other Apps

शिरोळ - नव्याने नगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या आणि पूर्वी ग्रामपंचायत असलेल्या शिरोळ गावच्या विस्तार वाढीचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात असून लवकरच या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर एक कोटी सात लाख निधी पैकी पहिला हप्ता प्राप्त होत असून गावठाण विस्तार वाढीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली, शिरोळ नगरपरिषद विस्तारवाढी संदर्भात राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज शिरोळ येथील भूमी अभिलेख कार्यालयात उपस्थित राहून या प्रश्नाचा सविस्तर आढावा घेतला यावेळी शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे- धुमाळ, आणि भूमी अभिलेख अधिकारी श्रीमती मसने प्रमुख उपस्थित होत्या, सन २००६ साली शिरोळ गावठाण विस्तार वाढीची अधिसूचना प्रसिद्ध झाली होती, त्यावेळी गावठाण विस्तारवाढी मध्ये २५६ गट समाविष्ट होते सदरची विस्तार वाढ ही चार गटांमध्ये विभागली होती ज्यामध्ये औद्योगिक, शेती व इतर असे वर्गीकरण केले होते पण विस्तारवाढीचे हे काम निधीअभावी जवळपास पंधरा वर्षे रखडले होते, सार्वजनिक आ...
"शामरावनगर परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात" - नगरसेवक अभिजीत भोसले.
- Get link
- X
- Other Apps
सांगली :- शहरातील शामरावनगरसह परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. दलदल निर्माण होते. या परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नगरसेवक अभिजीत भोसले यांनी केली होती. याची दखल घेत शामरावनगर परिसरात साचणारे पाणी नैसर्गिक उताराने काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. शहरातील शामरावनगर परिसरात पावसाळ्यात प्रचंड दलदल निर्माण होते. पाण्याचा नैसर्गिक निचरा होत नसल्याने दरवर्षी शामरावनगमधील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागतात. रस्ते खराब होतात. नागरिकांना दळणवळण करण्यात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतौ. पाणी साचून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढते. परिणामी साथीचे रोग पसरतात. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. प्रभागातील काँग्रेसचे नगरसेवक अभिजीत भोसले यांनी या परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली होती. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. अखेर त्यांच्या पाठपुरवठाला यश आले आहे. पावस...
मजरेवाडी इंटकवेलमधील गाळ काढण्याचे काम सुरु
- Get link
- X
- Other Apps
नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांच्याकडून पाहणी. इचलकरंजी - आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणार्या मजरेवाडी येथील जॅकवेल परिसरातील इंटकवेलमधील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच याठिकाणी बसविण्यात येत असलेल्या नवीन पंपाच्या कामाची नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी पाहणी करत माहिती घेतली. यावेळी पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, माजी सभापती विठ्ठल चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.इचलकरंजी शहराला मजरेवाडी येथून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. याठिकाणी असलेल्या इंटकवेलमधील गाळ काढण्याचे काम दोन वर्षातून हाती घेतले जाते. त्यामुळे पाणी उपसा करण्यासह पंपावर पडणारा दाब कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याच्या कामातील अडथळे दूर होतात. पुढील जून महिन्यात पावसाला सुरुवात होत असल्याने तत्पूर्वी इंटकवेलमधून गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी योजना अंतर्गत प्राप्त 1 कोटी 8 लाख 436 रुपयाच्या निधीतून मजरेवाडी येथे 540 अश्वशक्ती क्षमतेचे दोन...
कोरोना मुळे रोजगार नाही सर्व काही ठप्प , घडशी समाजाला शासनाकडून न्याय मिळावा - अनिल पवार
- Get link
- X
- Other Apps

सातारा - पूर्वीपासून देवस्थानांमध्ये सनई-चौघडा नगारा वाजवणे लग्न समारंभामध्ये सनईवादन बँड बॅन्जो मावळा ग्रुप यासारखी कामे करणे फुलांचे हार बनविणे या व्यवसायावर उदरनिर्वाह करतो घडशी समाज हा पूर्वीपासूनच गरीबीत जीवन जगणारा घडशी समाज हा भूमी हिन आहे त्यामुळे बॅंन्ड बॅंजो हार व्यवसायावरच कसे बसे जिवन जगतो व या व्यवसायावर अवलंबून असतो समाजात दररोज रोजीरोटीचा प्रश्न असल्यामुळे शिक्षणाचे प्रमाण कमी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच लोक सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत गेल्या वर्षी कोरणा मुळे कोणताही व्यवसाय चालला नाही सरकारी कोणतीही मदत घडशी समाजाला मिळाली नाही भुमी नाही शिक्षणा ची ईच्छा असुन घरची परिस्थिती बेताची त्या मुळे शिक्षणाचा अभाव त्यामुळे सरकारी बॅंकेचे लोन व्यवसायाला मिळत नाही मग या स्पर्धेच्या युगात टिकुन राहुन व्यवसाय चालावे या साठी खाजगी कर्ज काढून वरील व्यवसायात गुंतवणूक केली कोरोनामुळे ते कर्ज ही फीटले नाही जवळची जी काही थोडी पुंजी होती तिची मोडतोड करून कसंतरी जिवण जगावं लागलं व्यवसाय ठप्प असलेने मुला...
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट शाखेकडून विविध विभागातल्या 300 जणांना अन्नदान व फळवाटप.
- Get link
- X
- Other Apps

अक्कलकोट - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट वंचित बहुजन शाखेकडून विविध विभागातल्या कर्मचारी यांना अन्नदान व फळवाटप चा कार्यक्रम घेण्यात आला.* अक्कलकोट वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त लॉकडाऊन मध्ये उपास मार होत असलेले गरजू, व तसेच कोरोना विषाणू च्या दुसऱ्या टप्प्याच्या लढाईत आपले परिवार नातेवाईक कुटुंब सोडून जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपले कर्तव्य अतिशय इमानेइतबारे बजावणाऱ्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, तसेच रात्रंदिवस ड्युटी करणारे पोलीस प्रशासन आणि आपल्या जीवाची तमा न बाळगता प्रत्येकाच्या घरी गॅस सिलेंडर घरपोच करणारे कर्मचारी या सर्वांना वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट च्या वतीने अन्नदान व फळे वाटप करण्यात आली सुरुवातीला भिक्षुक लोकांचे अत्यंत उपासमार होत असताना त्यांना एक छोटासा हात देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या सर्व प...
6000 रुपयाची लाच घेताना तलाठी ताब्यात ; सांगली लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
- Get link
- X
- Other Apps

सांगली :- कवठे महांकाळ तालुक्यातील तिसंगी येथील रामु पांडुरंग कोरे वय ४३ वर्ष यांना ६,०००/ रुपये लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले.. सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे आजोबांनी तक्रारदार व त्याची आई यांचे नांवाने केलेल्या बक्षीस पत्राची हक्क अधिकार पत्रकात नोंद धरणे करीता तिसंगी, ता. कवठेमहांकाळ येथिल तलाठी श्री. कदम यांनी तक्रारदार यांचेकडे ९,०००/- रूपयेची लाच मागणी केली असल्याबाबत तक्रारदार यांनी सांगली लाच लुचपत कार्यालयाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तलाठी कोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे चर्चेअंती ६०००/- रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम दि. ११.०५.२०२१ रोजी घेवून येण्यास सांगीतलेचे निष्पन्न झाले. त्यानंतर दि. ११.०५.२०२१ रोजी तलाठी कार्यालय तिसंगों, ता. कवठेमहांकाळ येथे सापळा लावला असता रामु पांडुरंग कोरे वय ४३ वर्ष तलाठी, तिसंगी, ता. कवठेमहांकाळ, सांगली वर्ग-३ यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून तक्रारदार यांचेकडू...
कर्नाळ, इनाम धामणी येथे औषधांचे किट वाटप ; गुलाबराव पाटील हॉस्पिटल, पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा उपक्रम
- Get link
- X
- Other Apps

सांगली - गुलाबराव पाटील होमिओपॅथिक हॉस्पिटल आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने कर्नाळ आणि इनाम धामणी येथे गृह अलगीकरणातील कोरोना रुग्ण आणि कुटुंबासाठी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते औषधांचे किट वाटप करण्यात आले. या गावांनी सुरू केलेल्या कोरोना उपचार केंद्रांनाही त्यांनी भेटी दिल्या. कर्नाळ येथील किट वाटपाच्यावेळी सरपंच सौ. संध्या कांबळे, उपसरपंच युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील, संतोष मिसाळ, राजेश एडके, नाना घोरपडे, गणेश घोरपडे, अमोल पाटील, रावसाहेब मोहिते, सचिन पाटील, सुनिता कारंडे, वैभव बंडगर, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील पत्रकारांना ५०० रु कोटीचे पेकेज जाहीर करावे - महाराष्ट्र पत्रकार संघ
- Get link
- X
- Other Apps

सांगली - राज्य शासनाने कोरोना काळात सर्व उद्योग क्षेत्रातील घटकांना मदत जाहीर केली ही उल्लेखनिय बाब आहे.परंतु या कोरोना काळात देशाचा चौथा स्थंब दुर्लक्षित आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रतील सर्व पत्रकार यांच्या उदरनिर्वाह करीता किमान ५०० कोटी रु कोरोना काळातील मदत जाहीर करून सर्व पत्रकार यांच्या खात्यावर १०,००० रू जमा करावी अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे ईमेल आंदोलन द्वारे केली आहे. कोरोना काळात पत्रकार यांच्यावर अत्यंत आर्थिक बिकट परिस्थिती ओढवली आहे. छोटी मोठी दैनिक वृत्तपत्र पडण्याच्या मार्गावर आहेत. आजच्या या भयानक कोरोना काळात पत्रकार यांची व्यथा काळजाला पाझर फुटणारी ठरली असून समाजाला दिशा देणारा पत्रकार आज पोटाची खळगी भरण्यासाठी दिशाहीन झाला आहे. राज्यशासनाने या कोरोना काळातील पत्रकारितेला जीवदान देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पत्रकार यांना किमान ५०० रु कोटीचे पेकेज जाहीर करून पत्रकार यांच्या खात्यावर प्रत्येकी १०,००० रु वर्ग करून त्याची अंमलबजावणी करावी ही नम्र व कळकळीची विनंती . अ...
कोरोनाचा प्रसार आणि फैलाव रोखण्यांसाठी २१ मे पर्यंत कडक लॉकडाऊन
- Get link
- X
- Other Apps

हातकणंगले - आजूबाजूच्या गावांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे संबंधित गावांनी सोयीनुसार लॉक डाउन केले आहे.परिणामी त्या गर्दीचा भार हातकणंगलेत वाढत असल्याने हातकणंगलेतील कोरोनाचा प्रसार आणि फैलाव रोखण्यांसाठी बुधवार ता.१२ते शुक्रवार तारीख २१ मे पर्यंत कडक लॉक डाऊन करण्याचा निर्णय आज नगरपंचायतीमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यांत आला. दरम्यान राज्य किंवा केंद्र शासनाने याही पुढे लॉक डाऊन जाहिर केले तर त्या निर्णयाशी बांधील रहात२१ तारखेच्या पुढेही लॉक डाऊन नियमित करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हातकणंगलेतील रूग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे, शिवाय मृत्यूंची संख्याही अधिक आहे. अशातच परिसरांतील आळते, कुभोज, मजले, कोरोची आदी गावांतही रुग्णसंख्या वाढत असल्याने त्या त्या गावांनी लॉक डाऊन चा निर्णय जाहिर केला आहे. त्यामुळे हातकणंगलेतील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील दिशा ठरवण्यांसाठी आज नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. यावेळी दहा दिवस कडक लॉक डाऊनचा निर्णय घ...
बिरुबन सुळकी खडी चेथे कृष्णामाईचे आनंदात स्वागत !
- Get link
- X
- Other Apps

आटपाडी :- टेंभू योजनेचे बंदिस्त पाईपलाईन मधून बिरुबन सुळकी खडी आटपाडी येथे आलेल्या कृष्णामाईच्या पाण्याचे ढोल कैताल आणि घोषणांच्या गजरात पुजन करण्यात आले . राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्याचे ज्येष्ट नेते आनंदरावबापु पाटील यांच्या सन्माननीय उपस्थितीत आणि डिसेबर १९९२ रोजी पाणी लढ्यासाठी क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी डॉ.भारत पाटणकर यांना आटपाडीत सर्वप्रथम आणणारे पाणी लढ्याचे अग्रदुत , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विधीवत पुजन करीत कृष्णाईच्या पाण्याचे स्वागत केले गेले . क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी , जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील, डॉ .भारत पाटणकर, आनंदरावबापू पाटील , पाणी चळवळ, श्रमिक मुक्ती दल यांच्या विजयाच्या घोषणा देत कृष्णामाईस वंदन करण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, एस.टी.च्या इंटक युनियनचे जिल्ह्य...
कडेगांव तालुक्याला व्हेंटिलेटरचे सहा बेड देणार : खासदार संजय पाटील : कडेगांव प्रांताधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक
- Get link
- X
- Other Apps

बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकाऱ्यांना १ हजार रुपये दंड : वांगी येथे ऑक्सिजनचे ३० बेड सुरू होणार कडेगाव :- कडेगाव तालुक्यात कोरोना महामारी मध्ये प्रशासनाने अतिशय चांगले काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण आहे. सध्या तालुक्यात ऑक्सिजनचे ४० बेड असले तरी व्हेंटिलेटर बेड एकही नाही. तालुक्यातील चिंचणी (वांगी) ग्रामीण रुग्णालय आणि कडेगांव येथील ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्येकी ३ असे एकुण ६ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देणार आहे. अशी माहिती खासदार संजय काका पाटील यांनी दिली. कडेगांव येथील प्रांताधिकारी कार्यालयात खासदार संजय काका पाटील यांनी तालुक्यातील कोरोना महामारीचा आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ.शैलजा पाटील, भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, कॉंग्रेसचे युवा नेते हिम्मतराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, सुरेंद्र वाळवेकर, अ.शांता कंनुजे प्रमुख उपस्थित होते. ...
महानगरपालिका क्षेत्रातील कोरोणा विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नागरिकांकडून नियमांचे सक्तीने पालन करुन घ्यावे.
- Get link
- X
- Other Apps

महापौर दिग्विजय प्रदीप सुर्यवंशी यांचे महापालिकेतील बैठकीत सूचना सांगली : महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नागरिकांकडून नियमांचे सक्तीने पालन करुन घ्यावे असे आवाहन महापौर दिग्विजय प्रदीप सुर्यवंशी यांनी महापालिकेत आयोजित बैठकीत केले. महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिवसें दिवस कोरोना विषाणूने बाधीत रुग्णांच्या वाढत्या संख्येस आळा घालण्यासाठी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांचे अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालय येथे बैठक झाली. यावेळी महापौर सूर्यवंशी बोलत होते. या बैठकीमध्ये बाधीत व्यक्तींच्या संपर्कात असल्यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तीही मोठ्या प्रमाणावर बाधीत होत असलेचे आढळून येत आहे. त्यामुळे भागातील नेमणेत आलेल्या समन्वयक यांनी बाधीत रुग्णांच्या कुटुंबीयांना विनाकारण घरा बाहेर न पडणे व इतर व्यक्तींना घरात येऊ न देणे बाबतच्या सुचना करणेत याव्यात. पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच त्याचे घर व परिसर तात्काळ निरजंतूकीकरण (औषध फवारणी) करुन घेणेत यावा. बाधीत व्यक्तींच्या घरावर ...
सांगली मनपा क्षेत्रात सोमवारी 3051 जणांचे लसीकरण
- Get link
- X
- Other Apps

सांगली - सांगली मनपाक्षेत्रात सोमवारी 3051 जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली. यामध्ये 18 ते 44 वयोगटातील 1640 जणांनी लस घेतली तर 45 वर्षावरील 1411 जणांनी दुसऱ्यांदा लस घेतली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी 18 ते 44 वयोगटातील 1640 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली तर 45 वर्षावरील 1411 व्यक्तींनीही लसीकरण करून घेतले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आरोग्य विभागाकडून 31 ठिकाणी हे लसीकरण सुरु आहे.
कडेगाव नगरपंचायतच्या वतीने कोरोना ला हरविण्यासाठी आशा वर्कर : अंगणवाडी सेविका यांना सर्व सुविधा देणार - सौ.संगीता राऊत,नगराध्यक्षा कडेगाव
- Get link
- X
- Other Apps

कडेगाव : परवेझ तांबोळी नगरपंचायत कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज असून आशा वर्कर,अंगणवाडी सेविका यांना नगरपंचायत मार्फत मास्क ,सॅनिटायजर,हॅन्डग्लोज सुविधा देण्यात येत असून त्यांच्या माध्यमातून सर्व कडेगाव शहरातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून ब्रेक द चेन करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत,आज नगरपंचायत सभागृहामध्ये आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांची मीटिंग घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, या महामारी विरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी घरी सुरक्षित राहून प्रशासनास सहकार्य करावे कोरोनाची काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करावी, भीती बाळगू नका.मास्क सॅनिटायजर चा सतत वापर करा हात स्वच्छ धूत जावा आणि सुरक्षित अंतर ठेवा, आम्ही सर्व जण आपल्याबरोबर आहोत. लवकरच परगावहून कडेगाव शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांची तपासणी केल्याशिवाय त्यांना प्रवेश देणार नाही असा निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे कडेगाव शहर सुरक्षित...
अॅपेक्स कोवीड सेंटर बंद करण्याचे आदेश : आयुक्त नितीन कापडणीस यांचे आदेश
- Get link
- X
- Other Apps

सांगलीः- सांगली-मिरज रस्त्यालगत असलेले अपेक्स कोव्हिड केअर सेंटर बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दिले आहेत. याबाबतची नोटीस रुग्णालय व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. यामध्ये यापुढे नवीन रुग्णांची भरती करु नये, आहे त्याच रुग्णांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज द्यावा असे आदेशामध्ये म्हंटले आहे. अपेक्सच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात आली. सांगली-मिरज रस्त्यालगत कोव्हिड केअर सेंटर म्हणून अधिगृहीत केले होते. दरम्यान रुग्णालय सुरु झाल्यापासून तेथील अनागोंदी कारभाराबाबत मनपा आयुक्तांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. रुग्ण, नातेवाईकाशी गैरवर्तन करणे, बिलांसाठी अडवणूक करणे, उर्मट, अ्वाच्च भाषेत बोलणे, अस्वच्छता यासह अन्य तक्रारींचा यामध्ये समावेश होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी आयुक्त कापडणीस यांनी स्वत: या रुग्णालयाला भेट दिली होती. तेथील कारभाराचा पंचनामा केला होता. असलेले अपेक्स रुग्णालय महापालिकेने रुग्णालय व्यवस्थापनाला कारभार सुधारण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली होती. मात्...
तुंग येथील बालिकेच्या खुनाचा उत्कृष्ठ तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी , अमंलदार याचा गौरव
- Get link
- X
- Other Apps

पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम यांचे हस्ते प्रशस्ती पत्र, रोख रक्कम देऊन सन्मानित सांगली :- गेल्या वर्षी मे महिन्यात सांगली नजीकच्या तुंग येथील चांदोली वसाहतीत एका 8 वर्षीय बालिकेचा निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा नोंद झाला होता. तर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर यांनी करून त्या बालकाविरुध्द सबळ पुरावा हस्तगत करुन मा.बाल न्यायालयत गुन्हयाचा दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. या केसचे कामकाज जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख व कोर्ट कडील पैरवी म्हणून काम पाहणारे पोहेकॉ/ गणेश वाघ, मपोहेकॉ/ रमा डांगे, मपोना/ वंदना पवार यांनी पाहिले. या गुन्हयातील एकुण १४ साक्षीदार तपासण्यात आले. या गुन्हयाचा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर यांनी उत्कृष्ठ तपास केल्याने बालअपचारी आरोपी यास १२ वर्षे सक्त मजुरी शिक्षा झाली आहे. सदर केस चा निकाल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय श्री सातवळेकर कोर्ट सो यांनी दिनांक ६.५.२०२१ रोजी दिला, बालअपचारी यास अश्या प्रकारच्या गंभीर गुन्हयात शि...
नवऱ्याच्या अनैतिक संबंधाला कंटाळून कुची येथील विवाहितेची आत्महत्या
- Get link
- X
- Other Apps

कवठेमहांकाळ - कवठेमंकाळ तालुक्यातील कुची येथील सौ.माधवी धनाजी जाधव या विवाहितेने नवऱ्याच्या बाहेरील अनैतिक संबंधाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. कुची येथील जाधव वस्ती वरील धनाजी मारूती जाधव यांची पत्नी सौ.माधवी धनाजी जाधव या विवाहीत महिलेने नवऱ्याच्या अनैतिक संबधाला कंठाळून राहत्या घरी पहाटे लोखंडी अंगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेची फिर्याद मयत माधवी यांची आई वैशाली पाटील विसापूर ता.तासगाव यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे. यापुर्वीही चार वेळा नवऱ्याने द्राक्ष बागेसाठी माहेरहून पैसे घेऊन ये . शिवाय बाहेरील शेजारच्या मुलीशी धनाजी याचे प्रेम संबंध आहेत त्यामुळे मयत माधवीला सतत त्रास केला जात होता .म्हणून माधवीला चार वेळा जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता असे मयत माधवीच्या आईने आपल्या तक्रारी म्हटले आहे.या पुर्वीही त्याचार छळ व मारहाणीची कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिवाय सांगली महिला कक्षात ही तक्रार केली ह...